पाच्छापुर जंगलात आईसह तीन मुंलाचे झाडाला लटकलेले मृतदेह आढळल्याने खळबळ


पडघा : भिंवडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाच्छापुर येथील जंगलात झाडाला लटकलेले आईसह तीन मुंलाचे सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.तर पत्नी आणी मुंलाचे मृतदेह बघुन वडीलांनीही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 श्रीपत बच्चु बंगारे रा उंबरखांड पाच्छापुर असे विष प्राशन करणाऱ्या ईसमाचे नाव असुन पत्नी रंजना (३०) मुलगी दर्शना (१२) रोहीणी (६) रोहीत (९)अशी जंगलात झाडाला लटकलेल्या आढळून आलेल्या मृतदेहाचीं नावे असुन हे चौघेही बेपत्ता असल्याची तक्रार श्रीपत याने २१ ऑक्टोबर रोजी पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. गुरुवार दिंनाक १० डीसेंबर रोजी श्रीपत याचा भाऊ व पत्नी गण्या डोंगर आवळ्याची वाडी पाच्छापुर येथील जंगलात लांकडे आणायला गेले असता एका झाडाला लटकलेले दुर्गंधी सुटलेले या चौघांचे मृतदेह आढळून आले.

 कपड्यावरून ओळख पटल्याने यांची माहिती त्याने श्रीपत यास दिली सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिकारी व पडघा पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टिमसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. तर श्रीपत याने दुसरे लग्न केल्याने पहीली पत्नी मयत रंजना यांच्यात मतभेद होते. दरम्यान पडघा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत .तर माझ्या बहीणीची व मुंलाची आत्महत्या नसुन हत्या असल्याचा आरोप मयत रंजना हीचा भाऊ अंनता भगत रा. साकडबाव शहापुर याने केला असुन पोलीसांनी योग्य तपास करून दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...