देशातील असंख्य सौंदर्यवतींवर मात करत उल्हासनगरच्या सौंदर्यवती बनल्या मिस आणि मिसेस इंडिया
खुशबू सेवानी मिसेस इंडिया;गजनंदिनी गिरासे मिस इंडिया
उल्हासनगर : देशातील असंख्य सौंदर्यवतींवर मात करून उल्हासनगरातील खुशबू शेवानी या महिलेने मिसेस इंडिया व महाविद्यालयीन विद्यार्थीनी गजनंदिनी(गौरी)गिरासे हिने मिस इंडियाचा सरताज पटकावला आहे.शहराच्या शिरपेचात दोन्ही सरताज एकाच दिवशी आल्याने या दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.
खुशबू अजय शेवानी ह्या महापौर महापौर लिलाबाई आशान यांच्या परिसरात राहत असून त्यांचे पती अजय शेवानी हे उल्हासनगर महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर आहेत. पती सोबतच सासरे पितांबर शेवानी,सासू राणी शेवानी मुलगी हिना व मुलगा प्रतिक यांनी स्पर्धेसाठी हुरूप दिल्याने खुशबू ह्या गेल्या ८ महिन्यापासून स्पर्धेची तयारी सुरु केली होती.
गजनंदिनी (गौरी) देवेंद्र गिरासे ही कॅम्प नंबर ४ मध्ये राहत असून तिचे वडील देवेंद्र गिरासे व काका सचिन यांचे मेडिकल स्टोर्स आहे.गजनंदिनी ही डीफार्मसी मध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.आजोबा नवलसिंह,आजी रत्नप्रभा,आई जयश्री,काका सचिन,काकू अर्चना यांच्या प्रेरणेमुळे गजनंदिनी ही स्पर्धेत सहभागी झाली.
कोलकत्ता येथे काल शनिवारी पार पडलेल्या स्पर्धेत देशातील असंख्य महिला,तरुणींनी भाग घेतला होता.त्यात खुशबू शेवानी व गजनंदिनी गिरासे यांनी टॅलेंट राऊंड, नॅशनल कॉसटूम, फिटनेस,डांस काँपिटिशन यात बाजी मारली.आणि १० हजार रोख पारितोषिकासह मिसेस इंडिया व मिस इंडियाचा सरताज पटकावला.दोन तीन वर्षांपूर्वी अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे यांची पत्नी जयश्री रगडे ह्या बेस्ट स्माईल ऑफ इंडिया च्या विजेत्या ठरल्या होत्या.