डोंबिवलीत भोपाळसारखी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का ... -आमदार राजू पाटील
कल्याण :डोंबिवलीमध्ये जोपर्यंत भोपाळ सारखी मोठी दुर्घटना घडणार नाही , तोपर्यंत प्रंशासनाला जाग येणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया कल्याण ग्रामीणचेआमदार राजू पाटील यांनी दिली आहे . डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात भंगार गोडाऊनला लागलेल्या आगीच्या घटनास्थळी आमदार राजू पाटील यांनी भेट दिली.
डोंबिवलीजवळील सोनारपाडा गावात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली . डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात सतत आग लागण्याच्या घटना घडत आहेत . वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन त्याकडे अजिबात लक्ष देत नाही . त्यामुळे डोंबिवलीमध्ये भोपाळसारखी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जाग होणार का ? असा सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे .