ठाणे जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना मोफत ३५ लाखाचा अपघाती विमा

टीजेएसबी बँकेकडून शिक्षक संघटनांची मागणी मान्य



ठाणे:  ठाणे जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कोणतेही शुल्क न आकारता ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) ३५ लाखाचा अपघाती विमा घोषित केला आहे. याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५ हजार शिक्षकांना होणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी सांगितले. टीजेएसीबी मध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील ५ हजाराहून अधिक शिक्षक खातेदार असून शिक्षकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी काल बँकेच्या मुख्यालयात बँकेचे अधिकारी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली 

या बैठकीला भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश पदाधिकारी अनिल बोरनारे, कोकण विभाग संयोजक एन एम भामरे, ठाणे संयोजक संदीप कालेकर, शिक्षण क्रांती संघटनेचे कल्याण-डोंबिवली जिल्हा अध्यक्ष गजानन पाटील, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश मदने व पदाधिकारी राम पिसाट, विजय कोल्हे, संतोष बुवा आदी पदाधिकारी व टीजेएसीबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील साठे, सरव्यवस्थापक स्वप्नील जांभूळे, व्यवस्थापक प्रसाद मथुरे  उपस्थित होते.अपघातामध्ये एक अवयव निकामी झाल्यास ५० टक्के तर दोन अवयव निकामी झाली तर  विम्याची पूर्ण रक्कम मिळणार असल्याचेही बँकेकडून सांगण्यात आलेसंघटनांकडून यावेळी बँकेकडे अनेक सुविधा देण्याची मागणी करण्यात आली त्यामध्ये सेवेत असतांना नैसर्गिक मृत्य झालेल्या कर्मचाऱ्यांना निधी देणे, ओडीच्या सुविधासाठी शुल्क न आकारणे यासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाचे व्याजदर कमी करणे या मागण्या करण्यात आल्या त्यावर बँक सकारात्मक असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...