मुरबाड : पेट्रोल-डिझेल दरवाढ व रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्या निषेधार्थ शिवसेनेचा रास्ता रोको


मुरबाड :
केंद्र सरकारने केलेल्या भरमसाठ पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या व भाजपार्टीचे  रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यां बाबत केलेल्या बेताळ वक्तव्याच्या निषेधार्थ आज मुरबाड तिनहात नाका येथे केंद्र सरकार विरोधात  घोषणा बाजी करत रास्ता रोको करण्यात आला.कोरोना संकटातून  भरडून निघालेली सर्वसामान्य जनता कसबसं सावरत  जगण्याचा प्रयत्न करीत असताना नैसर्गिक  संकटाने हाती आलेले भातपिक हिरावून नेले त्यात जगण्याच्या विवंचनेत असताना केंद्र सरकारने नवीन भरमसाठ पेट्रोल -डिझेल दरवाढ करून सर्वसामान्य जनतेच कंबरड मोडून काढले. केंद्र सरकार एवढ्यावरच थांबले नाही. तर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या विरोधात जुलमी कायदे केले या विरोधात देशभर निषेध ,आंदोलन चालू आहे. 

याशिवाय भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी  प्रसार माध्यमांसमोर बेताल वक्तव्य करून  शेतकऱ्यांची टिंगलटवाळी केली. या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलने करण्यात आली.  मुरबाड तिनहात नाका येथे शिवसेनेने कल्याण -नगर महामार्ग अडवून रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला.यावेळी शिवसेनेचे विधान सभा क्षेत्र संघटक मधुकर (आप्पा )घुडे  तालुका प्रमुख कांतीलाल कंटे '  शिवसेना समन्वयक रामभाऊ दळवी , 'खरेदी -विक्री संघाचे चेअरमन प्रकाश पवार  सर,मुरबाड शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे , जि.प. सदस्या प्राजक्ता भावार्थे ,योगिता शिर्के, शिवसेना महिला आघाडी प्रमुख उर्मिला लाटे 'समाज सेवक मोहन भावार्थे , संतोष विशे यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे रास्ता रोको शांततेत पार पडला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...