७४ वर्षांनंतर गरेलपाडा गावात वीज पोहचली...

शहापुर : तालुक्यातील गरेलपाडा गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७४ वर्षांनंतरपहिल्यांदाच वीज पोहचली आहे. ही अत्यावश्यक असणारी सुविधा शहापूर उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता अविनाश कटकवार यांच्या उत्तम नियोजनामुळे साध्य झाल्याने सर्वथरांतून महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने चंद्र आणि मंगळापर्यंत झेप घेतली असली तरी एखाद्या  एखाद्या गावात वीज पोहोचवण्यासाठी ७४ वर्ष लागतील असे म्हटले तर आश्चर्य वाटेल. मात्र अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच  वीजेचा प्रकाश मिळण्यासाठी शहापूर तालुक्यातील गरेलपाडा गावाला  तब्बल ७४ वर्षे वाट पहावी लागली. तर गावात वीज नसल्याने अनेक अचडणींना सामोरे जावे लागत असल्याने गावातील विद्यार्थ्यांना रात्री दिव्याच्या अंधारातच अभ्यास करावा लागत होता.

अनेक वर्षे अनेक तांत्रिक अडचणीमुळे सदर काम रखडले होते. त्यातच महावितरणचे उपकार्यकरी अभियंता अविनाश कटकवार  यांनी सदर अडचणी दूर करून उत्तम नियोजनकरून तानसा तलावाच्या विसर्गात व्यापलेल्या गरेलपाडा येथे वीज पोहचविण्यासाठी  ३ किलोमीटर एच टी लाईन तसेच १.३५ किलोमीटर एल टी लाईन टाकण्यात आली.आणि ९० घरांच्या वस्तीला वीज पुरवठा सुरू केला.यामध्ये उपकार्यकरी अभियंता अविनाश  कटकवार यांना कल्याण परिमंडळचे मुख्य अभियंता.दिनेश अग्रवाल ,कल्याण मंडळ अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे,कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांचे मार्गदर्शन लाभले असून व सदर काम पूर्ण करण्यासाठी शहापूर ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता सुरज आंबूर्ले व सतिष इलेक्ट्रिकल इंजिनियर्स या एजन्सीने विशेष मेहनत घेतल्याचे कटकवार यांनी सांगितले .

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...