दोन भावंडांसह तिघांनी पाच दुचाक्या पेटवल्या; बसण्यावरून हटकल्याच्या रागातून कृत्य

दोघांना अटक;एकाची बालसुधारगृहात रवानगी.. 


उल्हासनगर: बिल्डिंगच्या बाहेर बसण्यावरून हटकल्याने व त्याची तक्रार घरी केल्याने संतप्त झालेल्या दोन भावंडांसह अल्पवयीन मुलाने पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या ५ दुचाक्या पेटवल्या आहेत. शनिवारी रात्री ही घटना उल्हासनगरात घडली असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी भावंडांना अटक केली असून अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 

कॅम्प नंबर ३ मधील २२ सेक्शन परिसरात प्रेम सागर बिल्डिंग आहे.बिल्डिंगच्या गेटसमोर तिघेजण रिक्षात बसून दारू पीत असल्याचा संशय एका रहिवाशाला आला.त्याने त्यांना बसण्यावरून हटकले.पुन्हा ते आल्यावर रहिवाशाने त्यांच्या पालकांकडे तक्रार केली होती.याचा राग आल्याने तक्रारदाराची दुचाकी त्यांनी पेटवली.मात्र बाजूलाच आणखीन चार गाड्या उभ्या असल्याने त्याही जळून खाक झाल्या.रहिवाशांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.पण तो निष्फळ ठरला.

दुचाक्यांना पेटवण्यात आल्याचा हा व्हिडीओ मासमीडियावर व्हायरल झाल्यावर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते,सहायक पोलीस आयुक्त डी.डी.टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर,पोलीस निरीक्षक (गुन्हे)राजेंद्र कोते,उपनिरीक्षक तुकाराम शेळके व गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी रोहित नखवाल,पवन नखवाल या दोन भावंडांना अटक केली आहे.तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...