पाणी योजना जनतेसाठी उभारा,ठेकेदारासाठी नकोत :आ. किसन कथोरे
टिटवाळा : ११ पाणी योजना उभारून ही गावातील माता ,भगिनींना डोक्यावरून पायपीट करत पाणी आणावे लागते, हे पाप ठेकदारांचे आहे, पाणी योजना उभारायची आणि बिल घेतले की योजना बंद हे चित्र बदलण्यासाठी महिलांनी सतर्क राहावे, पाणी योजना जनतेसाठी आहे,याचे भान ठेवून ती उभारा केवळ ठेकेदारांच भल करण्यासाठी पाणी योजना उभारू नका असा सज्जड दम आमदार किसन कथोरे यांनी कल्याण तालुक्याच्या पाणी पुरवठा विभागातर्फे आयोजित जल जीवन कृती आराखडा तयार करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत प्रशासनास दिला ,
यावेळी सभापती अनिता वाघचौरे, उपसभापती रमेश बांगर,भाजपचे तालुका अध्यक्ष चंदू बोष्टे, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री सासे, पंचायत समितीच्या सदस्य यशवंत दळवी, सौ देशमुख , दर्शना जाधव,रेश्मा भोईर, भारती टेंबे, म्हात्रे, ठोंबरे, यांच्यासह गट विकास अधिकारी श्वेता पालवे ,पाणी पुरवठा उप अभियंता श्री कांबळे ,श्री गहाणे , राजाराम चौधरी, देविदास चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते, यावेळी प्रत्येक कुटूंबाला स्वच्छ व नियमितपणे पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने जल जीवन मिशन सुरू केले आहे, याबाबत माहिती देत आमदार किसन कथोरे यांनी नवीन पाणी योजनांसाठी त्वरित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या ,