मुरबाड शहराची बाजारपेठ शुक्रवारी सुरु करण्याची मागणी;दुकानदार व फूटपाथ व्यवसायीकांचे होतेय नुकसान
मुरबाड : संपूर्ण मुरबाड तालुक्यात गेल्या नोव्हेंबर पासून कोरोनाचे होणारे संक्रमण हे शुन्यावर आलेले असल्याने इतर दिवशी शहरात नागरिकांची बाजारपेठेत तसेच शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना मुरबाड नगरपंचायत जाणीवपूर्वक दर शुक्रवारी मुरबाड शहरात भरणारा आठवडी बाजार बंद करुन संपूर्ण शहर बंद ठेवत असल्याने फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांची उपासमार होत असुन नगरपंचायतच्या कारभारामुळे नागरिकांमधे संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या मार्च पासून कोरोना कोविड १९ या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणुन शासनू सर्वत्र सुरु केलेले लाॅकडाऊन हे सप्टेंबर पासुन शिथिल केले असल्याने संपूर्ण शहरातील बाजारपेठा या खुल्या करण्यात आलेल्या आहेत.तर काही ठिकाणी सुरु असलेले आठवडी बाजार देखील भरत असताना मुरबाड तालुक्यातील शहरी औद्योगिक तसेच ग्रामिण भागात नोव्हेंबर पासून कोरोनाचे संशयीत रुग्ण आढळल्याचे मोठ्या प्रमाणात घट झालेली असताना एक प्रकारे तालुका कोरोना मुक्त झालेला असल्यामुळे हातावर पोट भरणारा चाकरमानी हा आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडत आहे.त्यामुळे फुटपाथवर भाजीपाला किंवा इतर व्यवसाय करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध होतो.व त्यावर त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.
परंतु मुरबाड नगरपंचायत शुक्रवारी आठवडी बाजार बंद ठेऊन संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत असल्याने फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांची उपासमार होतेच शिवाय किराणा मालाची दुकाने देखील बंद रहात असल्यामुळे अनेक सामाजिक संघटना , व्यापारी असोसिएशन व सर्वसामान्य नागरिक हे बाजारपेठ सुरु करणेसाठी नगर पंचायत राज विनंती करीत असुन या बंदमुळे काही हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाची देखील उपासमार होत असल्यामुळे नगर पंचायत च्या कारभारावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.