फाऊंटन टोल नाका येथील रस्त्यांच्या कामाला सुरुवात; खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश
ठाणे : खासदार राजन विचारे वर्सोवा पुलाची पाहणी करण्याकरीता आले असताना रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून दुरुस्ती व देखभाल व्यवस्थित रित्या होत नसल्याने राजन विचारे यांनी त्या पाहणी दौऱ्यात सदर रस्त्याचे काम आठ-दहा दिवसात मार्गी लावावे असे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या याची दखल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेऊन आज रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून खासदारांनी याची खातरजमा करण्यासाठी पहाणी अधिकारी यांच्यासमवेत केली.
या पाहणी दौऱ्यात टोल नाका ते फाउंटन हॉटेल पर्यंतचा ५०० मीटरचा रस्त्याची ३+३लेन वाढविण्याचे काम व रस्त्या कडेने गटार पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे जेणेकरून पावसाळ्यात साठणारे पाण्याचा निचरा होऊ शकेल तसेच महापालिकेने तयार केलेल्या सर्विस रोड खाली तीन पाईपलाईन असल्याने रस्ता उंच झाल्याने सदर रस्त्याची लेवल होत योग्य रीतीने करून त्यावर डांबरीकरण तातडीने करण्यात यावे अशा अधिकाऱ्यांना सूचना खासदार राजन विचारे यांनी दिल्या त्यामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे