आमदारांच्या गाडीला अपघात ;दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू
आमदार किसन कथोरे हे १३ डिसेंबर रोजी मतदार संघातील पूर्व नियोजित कार्यक्रम आटोपून कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून ६.४५ वाजता अनखर पाडा गोवेली वाहोली मार्गे बदलापूरकडे येत असताना त्यांच्या गाडीला समोरून बाईकने धडक दिली त्यामुळे मोठा अपघात झाला होता . आमदार कथोरे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. उपचारानंतर कथोरे यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने कल्याण तालुक्यातील दहागावजवळ एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर असलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाचं नाव अमित नंदकुमार सिंग असं आहे. हा तरुण कल्याण ग्रामीणमधील पिसवली परिसरातील रहिवासी होता. त्याच्यासोबत असलेल्या तरुणीचं नाव सिमरन सिंग असं आहे.हा अपघात इतका भीषण होता की गाडीची एअर बॅगही फुटली. मृत तरुण हा आई-वडिलांचा एकुलता एक होता. त्यामुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टिटवाळा पोलीस पुढील तपास करत आहेत