दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...

करोडो रूपयांची उलाढाल होणार ठप्प...



मुरबाड : दोनशे वर्षांची परंपरा आसलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठो म्हसा यांत्रा या वर्षी रद्द करण्यात आल्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. यातल्या रद्द झाल्याने करोडो रूपयांच्या उलाढालीचा ब्रेक लागणार आहे.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या गावी ही यात्रा ही यात्रा भरत असते. ही यात्रा सलग १५ दिवस सुरू रहाते असल्याने करोडो रूपयांची उलाढाल होत असते. या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून भोठ्या प्रमाणात व्यापारी या ठिकाणी येत असतात.  या यात्रेत हवेसे,नवशे गवसे यांच्या साठी पर्वणी असते. बैलगाडीच्या शैरती साठी लागणारे खिल्लारी बैल या यात्रेत खरेदी विक्री होत असल्याने बैल बाजारात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. ही यात्रा थंडीच्या महिन्यात सुरू होत असल्याने मोठ्या प्रमाणात ब्लॅकेट व चादरींची  विक्री होत असते.  ही यात्रेत म्हसोबा देवाला केलेले नवस फेडण्यासाठी व नव्याने नवस करण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात. 

या ठिकाणी नवस फेडण्यासाठी म्हणजे गळ लावण्यासाठी भाविकांची गर्दी असते. गळ लावणे म्हणजे केलेला नवस भेडण्या साठी आलेल्या भाविकांच्या कंबरेला एक लोखंडी हुक टोचला जातो यालाच गळ लावणे म्हणतात. ही यात्रा म्हणजे बालगोपालांची पर्वणी असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण अनेक प्रकारच्या खेळण्याची दुकाने या यात्रेत येत असतात. या यात्रेत शेतीला लागणारी औजारे या ठिकाणी मिळत असल्याने शेतकरी मोठा संख्येने या ठिकाणी येत असतात. शेतक-यांना लागणारी घोंगडी या बाजारात मिळत असल्याने ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या ठिकाणी घोंगडी खरेदी साठी येत असतात. 

मनोरंजनासाठी लोकनाट्य (तमाशे ) फड या ठिकाणी येत असल्याने ही यात्रा पुर्ण रात्र गजबजलेली असते. मात्र या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही यात्रा रद्द केल्याने अनेक वर्षे या यात्रेवर अवलंबून असलेल्या व्यवसायीकाचे लाखो रूपयांचे अर्थीक नुकसान होणार असल्याने त्यांना मोठा झटका बसला आहे. ही यात्रा रद्द केलेली असली तरी मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले राहाणार की बंद राहाणार हे मात्र पष्ट झाले नाही.

          " कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने  कुठेही यांत्रेला परवानगी दिलेली नाही. हाच निकष म्हसा यात्रेलाही लागू होत असल्याने म्हसा यात्रा या वर्षी रद्द करण्यात आली आहे." - अमोल कदम , तहसिलदार मुरबाड.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

भिवंडीतील खासगी कर वसुलीचा ठराव तापला ; काँग्रेस नगरसेवकांचे पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन