ठाण्यात ८५ लाख ४८ हजार बनावट नोटा पोलिसांकडून जप्त.


ठाणे : भारतीय चलनातील दोन हजारांच्या दर्शनी मूल्य असलेल्या बनावट चलनी नोटांच्या विक्रीसाठी आलेल्या सचिन आगरे (२९) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. या त्रिकुटाकडून ८५ लाख ४८ हजारांच्या बनावट नोटाही हस्तगत करण्यात आल्या आहेत.

कापूरबावडी सर्कल येथील टीएमटीच्या बस थांब्यासमोरील रस्त्यावर एक व्यक्ती भारतीय चलनातील दोन हजारांच्या बनावट नोटा चलनामध्ये वटविण्यासाठी येणार असल्याची 'टीप' वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती.त्याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, अनिल सुरवसे, भूषण शिंदे, जमादार बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे आणि देविदास जाधव आदींच्या पथकाने आगरे याला सापळा रचून ९ डिसेंबर रोजी कापूरबावडी सर्कल येथून रंगेहाथ अटक केली. त्याच्या चौकशीमध्ये आणखी दोघांची नावे यात समोर आली. 

त्यानंतर मन्सुर खान (४५) आणि चंद्रकांत माने (४५) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून भारतीय चलनातील दोन हजार रुपये दराच्या ८५ लाख ४८ हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत. याशिवाय, नोटा छापण्यासाठी वापरलेले संगणक, प्रिंटर, पेपर रिम्स, शाई, कटर, मोबाईल आदी सामुग्रीही जप्त करण्यात आली आहे. आपसात संगनमताने या नोटा छापल्याची कबूलीही या आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.


 विक्री करण्यापूर्वीच धाड

एक लाखांच्या बदल्यात पाच लाखांच्या या बनावट नोटा विक्री करण्यासाठी हे टोळके गिºहाइकाच्या शोधात होते. त्यांनी या नोटा वटविण्यापूर्वीच युनिट पाचच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांनी याआधीही १२ लाखांच्या बनावट नोटा छापल्या होत्या. मात्र, त्या हलक्या दर्जाच्या असल्यामुळे त्या विक्रीसाठी बाजारात आणल्या गेल्या नव्हत्या, अशीही मोीिहती चौकशीत समोर आली आहे.


................................

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...