मनसे तर्फे महिला स्वयंरोजगार सर्वेक्षण..
घारवली चे माजी सरपंच योगेश रोहिदास पाटील यांनी मनसे आमदार राजू दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला स्वयंरोजगार सर्वेक्षण आयोजित करण्यात आले. उन्नती फाऊंडेशन तसेच फॅमिनी सॅनेटरी नेपकिन तसेच महिलांसाठी वेगवेगळे दहा रोजगार कसे करता येतील या विषयी मार्गदर्शन केले.
घरगुती खाद्य पदार्थ बनवणे,दिवाळी पदार्थ,पापड,लोणची,ऑरगॅनिक भाज्या विक्री, शिवणकाम,बाग शिवणे,नर्सींग कोर्स,पोल्ट्री फार्म,घरगुती अभ्यास वर्ग. सेनिटरी नॅपकिन बनवणे... असे अनेक उद्योग व्यवसाय याबद्द्दल माहिती देण्यात आली.घारवली गावातील गणेश मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्या वेळी माजी सरपंच आणि महाराष्ट्र सैनिक योगेश रोहिदास पाटील,वैशाली योगेश पाटील तसेच विधानसभा अध्यक्ष हरीश पाटील, शाखा अध्यक्ष समीर कोंढाळकर, सुदाम कळू पाटील, अस्मिता जैस्वाल, व सायली पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.