कोरोना काळात जबाबदारी झटकणाऱ्या आरटीओतील ८ लिपिकांच्या चौकशीचे परिवहन आयुक्तांचे आदेश

ठाणे परिवहन विभागात खळबळ



भिवंडी :  कोरोना (कोव्हिड-१९) या संसर्गजन्य रोगाला जागतिक महामारी घोषित करण्यात आली आहे.या कोरोना कालावधीत संपूर्ण शासकीय,निमशासकीय यंत्रणा जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात असताना व सर्व शासकीय निमशासकीय ,कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी (कोव्हीड-१९) सज्ज असतांना ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ८ लिपिक मात्र त्यांची जबाबदारी झटकून अनधिकृतपणे कर्तव्यावर गैरहजर राहिले होते.या गैरहजर कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई होणेसाठी राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष  शरद धुमाळ यांनी परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंग यांच्याकडे तक्रारी निवेदन सादर केले होते.शरद धुमाळ यांच्या तक्रारीची परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांनी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांना दिले होते त्यानुसार सदर ८ लिपिकांची चौकशी परिवहन आयुक्तांनी सुरू केली आहे. 


याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की,ठाणे आरटीओ येथील सर्व कर्मचारी कोरोना काळात नागरिकांना वाहन विषयक सेवा सुविधा देत असतांना विकास परबत, गीता लोके, बालाजी हटकर, स्वप्निल शेळके, रविराज कानगुडे, मानसी मांजरेकर, सचिन तायडे, बळीराम कांबळे हे ८ लिपिक संवर्गीय कर्मचारी कोणतीही पूर्व सूचना न देता अथवा नियमानुसार रजा मंजूर न करता अनाधिकाराने गैरहजर राहून शासकीय कामात अडथळे निर्माण केले होते. त्यामुळे सदर ८ लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्यासाठी राष्ट्रीय मानव हक्क मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद धुमाळ यांनी परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंग यांच्याकडे केलेल्या तक्रारीमुळे सदर ८  कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना दिले आहेत.या आदेशामुळे परिवहन विभागात प्रचंड खळबळ माजली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...