भिवंडीतील खासगी कर वसुलीचा ठराव तापला ; काँग्रेस नगरसेवकांचे पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन


भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या ठरावावरून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावास विरोध दर्शविला आहे.मंगळवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सुमारे २० नगरसेवकांनी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली.यावेळी पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील पालिका आयुक्तांकडे सादर केले.

दरम्यान आंदोलनादरम्यान आपण पालिका आयुक्तांची भेट घेतली असता सदरचा ठराव अजून माझ्यापर्यंत मंजुरीसाठी आलेला नाही.सदर ठराव माझ्याकडे आल्यानंतर त्यातील कायदेशीर बाबी तपासल्या जातील जर हा ठराव बेकायदेशीर असेल तर त्यास आपण मंजुरी देणार नाही असे आश्वासन आम्हाला पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी दिले असून जोपर्यंत हा ठराव मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शोएब गुड्डू यांनी दिली आहे.

या आंदोलनाप्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड , ज्येष्ठ नेते प्रदीप राका, वसीम अन्सारी , फराज बाबा , जाकीर मिर्जा, सिद्धेश्वर कामूर्ती , जुबेर अंसारी , आरिफ खान , आबू सुफियान , अरुण राऊत , नासिर खान , मोहम्मद हुसेन , साद मोमीन, इरफान वायरमन , साजिद खान , राहुल पाटील , मुजाहिद अंसारी , साजिद अंसारी , अश्रफ मुन्ना आदी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा