शहापुर तालुक्यात होणार सर्वप्रथम गावठाण मोजणी
कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांतून होणार शुभारंभ..
मोजणीसाठी घोगांवणार थेट ड्रोन कॅमेरा
अघई : जमीन मोजणी प्रक्रिया अत्यंत कीचकट असते.त्यासाठी वेळ व मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर वापरावे लागते.त्यामुळे या वर उपाय म्हणून सरकारकडून आधुनिक यंत्राने गावांचे सिमाकंन आणि गावठाण मोजणीचे काम ड्रोन च्या मदतीने होणार आहे.विशेष म्हणजे एका गावाचे गावठाण केवळ एका दिवसात मोजुन पूर्ण होणार आहे.त्यामुळे सरकारी यंत्रणांचा वेळ,खर्च बचत होण्यास मदत होणार आहे.
ग्रामपंचायती च्या मालकी हक्कात येणाऱ्या गावठाण जमिनीची मोजणी करून त्या जागेवर वर्षानुवर्ष वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना मालकी हक्क देवुन प्रॉपर्टी कार्ड देण्याची तयारी सरकार कडुन सुरू झाली आहे.त्याची तयारी कोकण विभागातील ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यातुन होणार आहे. आदिवासी रहिवाशांनी या योजनेचे स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे. जानेवारी महिन्यात शहापूर तालुक्यात ड्रोन मोजणीला सुरवात केली जाणार असून,गावठाण जागेत राहाणाऱ्या कुटुंबाची नोंद घेवुन भूमि अभिलेख कार्यालया कडुन सबंधित कुटुंबांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याचे शहापुर चे भूमि अभिलेख उपअधीक्षक श्री.राजेंद्र लोंढे यांनी सांगितले.