डोंबिवली मध्ये " एक धाव कोविड "; शिवसेना मध्यवर्ती शाखेकडून जनजागृती रनचे आयोजन..
डोंबिवली: शिवसेना मध्यवर्ती शाखा,डोंबिवली व "रनर्स क्लेन" यांनी कोविड ह्या आजारसंबंधी लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी दिनांक १३ डिसेंबर २०२० रोजी जनजागृती रनचे आयोजन केले होते. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व मोडक यांच्या देखरेखे द्वारे तसेच Runner's Clan चे अध्यक्ष लक्ष्मण गुंडप यांच्या नेतृत्वाखाली ही रन सामाजिक अंतराचे भान राखून व सर्व नियम पाळून यशस्वीपणे पार पाडली . धावक विविध घोषणांचे फलक घेऊन धावत होते.
धावकांची वैद्यकीय तपासणी ,धावकांना मास्क व टी- शर्टचे वाटप , धावकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , बक्षिस समारंभ - सत्कार , स्पर्धा संपल्यावर सर्व धावकांना नाश्त्याची सोय ह्या व इतर सर्व बाबींची योग्य काळजी घेतली होती. अत्यंत कमी वेळात ह्या रनचे आयोजन केल्याबद्दल श्री राजेश मोरे , श्री मोडक , श्री लक्ष्मण गुंडप व त्यांच्या टिमचे समाजाने अभिनंदन केले व आयोजकांनी सर्व धावपटुंचे आभार मानले.