कुडूस येथील युनियन बॅक कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या
वाडा: कुडूस येथील युनियन बॅक ऑफ इंडिया या शाखेतील कर्मचारी नेनावथ दिलीपकुमार नाईक(२८) यांनी आज दुपारच्या सुमारास भाड्याने राहात असलेल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुडूस येथे युनियन बॅक ऑफ इंडिया या बॅकेची शाखा आहे.
या शाखेत नेनावथ नाईक हे कर्मचारी म्हणून कार्यरत होते.मैत्री काॅम्प्लेक्स या इमारतीत तो आपल्या सहका-यासह राहात होता. नेनावथ आज बॅकेत कामाला गेला नव्हता सायंकाळी सहकारी कर्मचा-याने दरवाजा उघडला असता त्याला गळफास घेतलेला नेनावथ दिसला.त्याने लगेच पोलिसांना ही माहिती दिली.नेनावथचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता.या घटनेचा तपास कुडूस पोलिस करीत असून रात्री उशीरापर्यंत तपास कार्य सुरूच आहे.