लेखक, दिग्दर्शक एकनाथ देसले यांना 'शिवरक्षक' पुरस्कार प्रदान
मुरबाड: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजाशी लढताना वीर मरण आलेले क्रांतिवीर भाई कोतवाल यांच्या १०८ व्या जयंती निमित्त आज वडगाव कोल्हाटी औरंगाबाद येथे नाभिक सेवा संघाच्या वतीने क्रांतिवीर भाई कोतवाल यांच्या फोटो चे प्रकाशन शहिद भाई कोतवाल चित्रपटाचे दिग्दर्शक एकनाथजी देसले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी एकनाथजी देसले म्हणाले की अनेक क्रांतिवीर हे इतिहासाच्या पायापर्यंत पोहचले नाहीत. याला कारणीभूत राजकीय व सामाजिक उदासिनता आहे पण नाभिक सेवा संघाच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे त्यामुळे क्रांतिवीरांचा इतिहास त्या त्या समाजापर्यंत तरी पोहचत आहे क्रांतिवीरांचा इतिहास १३५ कोटी लोकांपर्यत पोहचवने हिच खरी जयंती निमित्त श्रध्दांजली ठरेल