माझे कुटुंब माझी जबाबदारी;कोकण भवनमध्ये कोरोना चाचणी


नवी मुंबई : कोरोना विषाणू (कोविड-१९) संक्रमण व प्रादुर्भाव या अनुषंगाने कोकण भवन इमारतीत विभागीय महसूल आयुक्त कार्यालय आणि नवी मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने इमारतीतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी मोफत  कोरोना विषयक (RT-PCR व  Antigen) चाचणी करण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

आज दि. ११डिसेंबररोजी सकाळी ११ वा. कोकण भवन येथील महिला भोजन कक्ष, दुसरा मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे, उपायुक्त (विकास) श्री.गिरीष भालेराव, उपायुक्त (करमणूक) श्रीम. सोनाली मुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, नायब तहसिलदार श्रीम. माधवी डोंगरे उपस्थित होत्या.दिवसभरात एकूण १३८ एवढया चाचण्या करण्यात आल्या.  त्यापैकी १३८ चाचण्या  निगेटिव्ह आल्या व एकही पॉझिटिव्ह चाचणी मिळाली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी पथक डॉ.तन्मय (BAMS) , डॉ.रत्नराज (BAMD/MD) यांनी यासाठी विशेष श्रम घेतले.  या शिबीरासाठी उपस्थित  महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या होत्या. या शिबीराच्यावेळी सोशल डिस्टनसिंगसह मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करण्यात आला.   

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...