आजोबा पर्वतावरील विजेचा प्रश्न सोडविण्याची आमदार किसन कथोरें कडे मागणी

 


मुरबाड : शहापुर  तालुक्यात असणारे रामायण कालीन तिर्थस्थळ आजोबा पर्वत  हा अजूनही सोयीसुविधे पासून वंचित राहिला आहे. या ठिकाणी रामायण ग्रंथाचे रचनाकार महर्षी वाल्मिक रुषी यांची समाधी आहे परंतु आजही इथे येणाऱ्या भक्त व पर्यटकांना सोयी उपलब्ध नाहीत.

 यासाठी मुरबाड येथे टाकेश्वर मठाचे मठाधिपती योगी फुलनाथ बाबा यांनी मुरबाड विधानसभा मतदार संघांचे  आमदार  किसनजी कथोरे  यांची भेट घेऊन गेली अनेक  वर्षा पासून प्रलंबित असलेल्या  वाल्मिक रुषींचा आश्रम आजोबा पर्वताचा वीज पुरवठा सूरु करण्यासाठी प्रयत्न करावा व हा  प्रश्न तात्काळ मार्गी लावावा या साठी व इतर विषयावर चर्चा केली. आमदार कथोरे साहेबांनी योगी फुलनाथ बाबांच्या सर्व समस्या ऐकून त्या  १००% सोडवणार असल्याची व आजोबा पर्वताचा विजेचा प्रश्न  लवकरात लवकर सुटण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही  यावेळी आमदार महोदयांनी दिली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...