जुन्नरच्या शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवसस्थानेच सलाईनवर


जुन्नर: जुन्नर येथील सरकारी रुग्णालयाची व तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शेजारीच निवासस्थाने देखील बांधण्यात आली,२०१६ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरित देखील करण्यात आली,परंतु रुग्णालयाची मुख्य इमारत व अधिकारी व कर्मचाऱ्यांची जी निवासस्थाने आहेत त्यांच्या छतांमधून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असे त्याचा त्रास तेथे उपचार घेणारे रुग्ण व दवाखान्यात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात होत असे.तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी जी निवासस्थाने बांधलेली आहेत त्यात देखील मोठ्या प्रमाणात समस्या आहेत,त्या सर्व निवसस्थानांच ड्रेनेज चे पाणी जाण्यासाठी योग्य ती व्यवस्था केली नसल्याने सर्व पाणी इमारतींच्या आजू बाजूला मोठ्या प्रमाणात साठून राहत आहे त्यामुळे रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,

साचलेल्या घाण पाण्यावर मोठ्या प्रमाणात डास, मच्छर फिरत असल्याने तेथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना डेंगू,मलेरिया सारखे आजार होण्याची धोका निर्माण झाला आहे.कोरोना साथीचा काळ असल्याने कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे व त्यातच त्यांना या समस्यांचा देखील सामना करावा लागत आहे,निवासस्थानांच्या परिसरामध्ये स्वच्छता नसल्याने व मोठया प्रमाणात झाडे झुडपे वाढल्याने  तेथे सरपटणारे प्राणी,साप, विंचू यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो,बऱ्याचदा या कर्मचाऱ्यांची लहान मूले या ठिकाणी खेळत असतात त्यांना या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होण्याचा अधिक संभव आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ड्रेनेज लाईन बांधणे, रुग्णालयाच्या आवारात संरक्षक भिंत बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे,अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांच्या आवारात संपवले व पंप हाऊस बांधणे तसेच संरक्षक भिंत व आवारात पेव्हिंग ब्लॉक बसविणे इ कामांच्या मागणीसाठी रुग्णालयाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पाठपुरावा करून अद्याप देखील सर्वच समस्या जैसे थे च आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...