TVs चांपियन बाईक स्पर्धेत जागृती पेणकर प्रथम
सरळगाव : TVs चांपियन स्पर्धेत कल्याण येथील जागृती पेणकर या युवतीने प्रथम क्रमांक पटकावल्याने तीचे सर्वच थरातून कौतूक होत आहे. ठाणे,पालघर जिल्हा वैश्य समाजाच्या कमीटीवर चिटणीस पदी कार्यरत असलेले किरण पेणकर यांची जागृती कन्या आहे. वैश्य समाजात ठाणे, पालघर , रायगड,मालवण - सिंधुदुर्ग जिल्ह्यात या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी जागृती ही एकमेव स्पर्धक ठरली आहे.
या स्पर्धेसाठी भारतातून ३७ मुलीं स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या . त्यामधून १६ मुलींची पुढील स्पर्धेसाठी निवड झाली होती. या १६ मुलींमध्ये खडतर अशा ४ फायनल घेण्यात आल्या. या चारी फायनल मध्ये जागृती हीने प्रथम, क्रमांक मिळवून आपला स्थान टिकवून ठेवले होते. अखेर १९ डीसेंबर २०२० रोजी झालेल्या चांपियन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत उत्तम बाईक रायडर्स होण्याचा मान मिळवला.हा मान मिळवल्याने तिचे वैश्य समाजा बरोबरच महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. Tvs कंपनीच्या वतीने २५ हजार रूपये रोख व TVs ची स्पोर्ट्स बाईक गाडीची चावी प्रधान केली.
"मला बाईक चालवण्याची लहानपणा पासून हाऊस होती. बाईक रायडर्स होण्याची माझी इच्छा माझे वडील,आई आणि माझा भाऊ यांच्या सहकार्यामुळे मी हे यश संपादन करू शकले."
- जागृती पेणकर,कल्याण.